A huge blank scroll flies above the land while two stork-winged women carry a sealed grain basket toward distant Shinar

जखर्‍याह 5

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
एक विशाल उडणारी गुंडाळी चोरांविरुद्ध व खोटी शपथ घेणाऱ्यांविरुद्ध शाप वाहते, त्यांच्या घरांत प्रवेश करून चुकीचे कृत्य भस्म करत. नंतर दुष्टतेला धान्याच्या टोपलीत मूर्त रूप दिले जाते, शिशाच्या झाकणाखाली सीलबंद केले जाते, आणि दोन पंख असलेल्या स्त्रिया शिनारमधील तयार केलेल्या जागी घेऊन जातात.
उडणारी गुंडाळीन्यायदुष्टता काढणेशिनार
1मी पुन्हा वर पाहिले आणि उडत असलेली एक चर्मपत्राची गुंडाळी मला दिसली.
2त्या दूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला एक उडती गुंडाळी दिसते! ती सुमारे वीस हात लांब व दहा हात रुंद असावी.”
3मग तो मला म्हणाला, “हा तो शाप आहे, जो या सर्व भूमीवर येणार आहे; चर्मपत्राच्या गुंडाळीच्या एका बाजूस जे लिहिलेले आहे ते असे, देशातून प्रत्येक चोर घालवून दिला जाईल आणि दुसर्‍या बाजूस म्हटले आहे, जो कोणी शपथ घेऊन खोटे बोलतो, त्या दोषीलाही देशातून घालवून दिले जाईल.
4सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘मी हा शाप पाठवेन, तो प्रत्येक चोराच्या घरात व माझ्या नावाने खोटी शपथ वाहणार्‍या प्रत्येकाच्या घरात प्रवेश करेल. तो त्या घरावर राहील आणि त्याचे लाकूड व दगडासहित सर्वाचा संपूर्ण नाश करेल.’ ”
5मग जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता तो पुढे आला आणि मला म्हणाला, “वर पाहा आणि बघ काय प्रगट होत आहे.”
6मी विचारले, “ते काय आहे?” “त्याने उत्तर दिले, ती एक टोपली आहे.” तो पुढे बोलला, “ती संपूर्ण देशातील लोकांची पातके आहेत.”
7मग तिचे शिसाचे झाकण वर उघडले गेले आणि त्या टोपलीच्या आत बसलेली एक स्त्री मला दिसली!
8याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “ती दुष्टाई आहे.” असे म्हणून त्याने तिला पुन्हा त्या टोपलीत ढकलले आणि त्या टोपलीचे शिसाचे झाकण बंद केले.
9मग मी वर बघितले—आणि मला दोन स्त्रिया उडतांना दिसल्या, त्यांच्या पंखात वारा भरलेला होता! त्यांचे पंख करकोचाच्या पंखांप्रमाणे होते आणि त्यांनी ती टोपली आकाश व पृथ्वीच्या मध्ये उचलली.
10तेव्हा जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता त्याला मी विचारले, “ती टोपली त्या कुठे नेत आहेत?”
11त्याने उत्तर दिले, “शिनार देशात, तिच्याकरिता घर बांधण्यासाठी. जेव्हा घर तयार होईल, तेव्हा ही टोपली त्यामध्ये तिच्या ठिकाणी ठेवण्यात येईल.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.