
लेवीय 12
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
लेवीय 12 बाळंतपणानंतरच्या शुद्धीकरणाचे कालावधी ठरवतो आणि आईला नंतर होमार्पण व पापार्पण आणण्याचे निर्देश देतो. जेव्हा कोकरा कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असतो तेव्हा अध्याय परवडणारा पर्याय म्हणून दोन पक्षीही देतो.
बाळंतपणशुद्धीकरणपुनर्स्थापनापरवडणारे अर्पण
1याहवेह मोशेला म्हणाले,
2“इस्राएली लोकांना सांग: एखादी स्त्री गरोदर राहिली आणि तिला पुत्र झाल्यास, ती आई विधीनियमाप्रमाणे सात दिवस अशुद्ध राहील. मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते, तशीच ती अशुद्ध समजावी.
3आठव्या दिवशी तिच्या पुत्राची सुंता करावी.
4नंतर पुढील तेहतीस दिवस संपेपर्यंत ती बाळंतपणात होणार्या आपल्या रक्तस्त्रावाच्या अशुद्धतेपासून शुद्ध होत असताना, तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये अथवा पवित्रस्थानात जाऊ नये.
5जर ती कन्येला जन्म देईल, तर ती स्त्री जशी तिच्या मासिक पाळीच्या वेळेस अशुद्ध राहते तशी ती चौदा दिवस अशुद्ध राहील. नंतर रक्तस्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तिने सहासष्ट दिवस वाट पाहावी.”
6हे शुद्ध होण्याचे दिवस संपल्यानंतर तिला पुत्र झालेला असो की कन्या, तिला पुढील नियम लागू आहेत: तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोकरू आणावे व पापार्पणासाठी होला किंवा पारव्याचे पिलू सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे घेऊन जावे.
7याजक याहवेहला ते अर्पण करून तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल म्हणजे बाळंतपणात होणार्या रक्तस्त्रावापासून ती विधिपूर्वक शुद्ध होईल. पुत्र किंवा कन्या झालेल्या स्त्री विषयी हा विधिनियम आहे.
8जर कोकरू आणण्याइतकी तिची ऐपत नसेल, तर तिने एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी दोन कबुतरे किंवा पारव्याची दोन पिल्ले आणावी. त्याचे अर्पण करून याजक तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल, म्हणजे ती पुन्हा विधिपूर्वक शुद्ध होईल.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.