Ephraimite families surveying fertile hills and a distant fortified city

यहोशुआ 16

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
योसेफच्या वंशजांना यार्देनपासून सुरू होऊन समुद्राकडे डोंगराळ प्रदेशातून पसरलेला प्रदेश मिळतो. एफ्राईमच्या सीमा निर्दिष्ट आहेत, मनश्शेतील शहरांसह, पण गेजेरमधील कनान्यांना हुसकावले जात नाही आणि ते सक्तीच्या मजुरीखाली राहतात.
एफ्राईमसीमावारसाअपूर्ण आज्ञापालन
1योसेफाच्या गोत्राला मिळालेल्या भागाची सुरुवात यार्देनेकडून होते, यरीहोच्या पूर्वेकडील झर्‍यापासून रानातून बेथेलच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत जाते.
2पुढे ती बेथेल (म्हणजे लूज) पासून अर्की लोकांची सीमा पार करून अटारोथपर्यंत गेली,
3पुढे ती पश्चिमेकडे यफलेटीच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोन व पुढे गेजेरपर्यंत उतरून भूमध्य समुद्रापर्यंत संपते.
4याप्रमाणे योसेफाचे वंशज मनश्शेह आणि एफ्राईम यांना वतन मिळाले.
5एफ्राईमच्या गोत्राची त्यांच्या कुळानुसार ही सीमा होती: त्यांच्या वतनाची सीमा पूर्वेतील अटारोथ-अद्दार येथून बेथ-होरोनचा वरील भाग
6आणि पुढे भूमध्य समुद्रापर्यंत गेलेली होती. उत्तरेकडील मिकमथाथवरून वळून पुढे तानथ-शिलोहवरून पूर्वेकडे यानोहा येथवर गेलेली होती.
7नंतर पुढे ती सीमा यानोहापासून खाली वळून अटारोथ व नाराह येथवर जाऊन यरीहोस पोहोचून यार्देनातून आली होती.
8तप्पूआहपासून ही सीमा पश्चिम दिशेस कानाहा ओहोळावरून जाऊन भूमध्य समुद्रापर्यंत संपते. एफ्राईम गोत्रास त्यांच्या कुळानुसार मिळालेले वतन हे होते.
9मनश्शेहच्या वतनातील काही नगरे आणि त्यांची गावे सुद्धा एफ्राईमचे वतन म्हणून वेगळी करून ठेवण्यात आली होती.
10त्यांनी गेजेरात राहणार्‍या कनानी लोकांना घालवून दिले नाही; आजपर्यंत कनानी लोक एफ्राईम लोकांमध्ये राहत आहेत. परंतु लादून दिलेली मजुरीची कामे त्यांना करावी लागतात.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.