Jonah kneels in prayer inside the shadowed great fish as seaweed and deep water surround him and warm light descends from above

योनाह 2

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
माशाच्या आत, योनाह लाटा व शेवाळांनी घेरलेल्या, मृत्यूजवळ पोहोचलेल्या खोलात बुडण्याचे वर्णन करतो. तो परमेश्वराला आठवतो आणि मंदिराकडे प्रार्थना निर्देशित करतो, रिकाम्या मूर्तींना स्थिर दयेशी विरोधाभास देत. योनाह आभारप्रदर्शनाचे वचन देतो, तारण देवाचे आहे असे घोषित करतो, आणि सोडवला जातो.
प्रार्थनासुटकाआभारप्रदर्शनतारण
1मग माशाच्या पोटातून योनाहने याहवेह त्याच्या परमेश्वराची प्रार्थना केली.
2तो म्हणाला: “माझ्या संकटात मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले. मृत्यूच्या खोल अधोलोकातून मी मदतीसाठी हाक मारली आणि तुम्ही माझी हाक ऐकली.
3तुम्ही मला खोलवर, समुद्राच्या अगदी हृदयात फेकून दिले आणि प्रवाहाने मला घेरले; आणि तुमच्या बेफाम लाटा आणि कल्लोळ यांनी मला झाकून टाकले.
4मी म्हणालो, ‘मला तुमच्या नजरेसमोरून दूर करण्यात आले आहे; तरीही मी तुमच्या पवित्र मंदिराकडे दृष्टी लावेन.’
5बुडविणार्‍या पाण्याने मला घाबरविले, माझ्या सभोवताली खोल डोह होता; माझे डोके समुद्राच्या शेवाळाने गुंडाळले होते.
6मी पर्वतांच्या मुळाशी पोहोचलो होतो; मी कायमचा जमिनीत बंदिस्त झालो होतो. तरीसुद्धा, हे याहवेह माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा जीव खड्ड्यातून वर आणला.
7“जेव्हा माझे जीवन क्षीण होत होते, तेव्हा मी याहवेहचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना वर तुमच्याकडे, तुमच्या पवित्र मंदिराकडे पोहोचली.
8“जे निरुपयोगी मूर्तींना कवटाळून राहतात ते स्वतःला परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर ठेवतात.
9परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने, तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन. मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन. मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ ”
10मग याहवेहने माशाला आज्ञा केली आणि त्याने योनाहला कोरड्या भूमीवर ओकून टाकले.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.