Bildad speaking beneath a vast night sky and dimmed moon

इय्योब 25

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
बिल्दाद देवाच्या सत्तेवर आणि स्वर्गाच्या असंख्य सैन्यांवर एक संक्षिप्त अंतिम भाषण देतो, ज्यांच्यासमोर उंचीवर शांती स्थापित आहे. चंद्र व तारेही देवाच्या दृष्टीने शुद्ध नसतील तर, तो विचारतो, स्त्रीपासून जन्मलेला किडा असलेला मनुष्य कसा नीतिमान असू शकतो?
बिल्दाददैवी सत्तामानवी दुर्बलताविश्व
1मग बिल्दद शूहीने उत्तर देत म्हटले:
2“प्रभुत्व आणि भय हे परमेश्वराचे आहे; तेच परमोच्च स्वर्गामध्ये शांती स्थापित करतात.
3त्यांच्या सैन्याची गणती करता येईल काय? आणि त्यांचा प्रकाश कोणावर पडत नाही?
4मग मर्त्य परमेश्वरासमोर कसा नीतिमान ठरेल? स्त्रीपासून जन्मलेला व्यक्ती पवित्र असू शकतो काय?
5जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही आणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत,
6मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे— मानवप्राणी, तो तर केवळ अळीप्रमाणे आहे!”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.