Families climbing toward higher ground as a vast flood rushes down a valley toward Philistine coastal cities

यिर्मयाह 47

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
फारो गाझावर हल्ला करण्यापूर्वी, यिर्मयाह उत्तरेकडून वाढणारे पाणी पलिष्ट व त्याच्या मित्रांना गिळून टाकताना वर्णन करतो. जवळ येणारी आपत्ती पालकांना सामर्थ्यहीन करते, शेजारील किनाऱ्यांकडून मदत शांत करते, आणि अजून विश्रांती न घेणारी तलवार बनते.
पलिष्टपूरन्यायविलाप
1गाझा शहरावर फारोहने आक्रमण करण्यापूर्वी तेथील पलिष्टी लोकांविषयी याहवेहचे यिर्मयाह संदेष्ट्याला वचन आले ते असे:
2याहवेह हे असे म्हणतात: “पाहा, उत्तरेकडून जलस्तर उफाळून येत आहे; तो प्रचंड प्रवाहात परिवर्तित होईल. जो त्यांच्या भूमीला व तेथील सर्व गोष्टीला आच्छादित करेल म्हणजे त्यात असणारी नगरे व तिथे राहणारे. लोक किंकाळ्या मारतील; त्या भूमीवरील सर्व रहिवासी विलाप करतील. कारण त्यांच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज, शत्रूंच्या रथाचा आवाज आणि त्यांच्या चाकांचा खडखडाट ऐकू येत आहे. त्यांचे पालक वळून त्यांच्या मुलांना मदत करू शकणार नाहीत; त्यांचे हात गळून गेल्यागत झाले आहेत.
4कारण सर्व पलिष्टी लोकांचा नाश करण्यास आणि सर्व अवषेशांना बाहेर काढण्याचा, सोर व सीदोन येथील लोकांना मदत करण्याचा समय आला आहे. याहवेह पलिष्टी लोकांचा नाश करणार आहेत, कफतोरहून आलेल्या रहिवाशांचा निःपात करणार आहेत.
5गाझा विलापाचे चिन्ह म्हणून आपले मुंडण करेल; अष्कलोन पूर्णपणे निःशब्द होईल. अहो तुम्ही घाटातील अवशिष्ट लोकहो, तुम्ही केव्हापर्यंत स्वतःच्या देहास जखमी कराल?
6“ ‘हाय रे, याहवेहच्या तलवारी, तू पुन्हा केव्हा विसावा घेणार? जा! आपल्या म्यानात परत जा; शांत राहा व स्तब्ध हो.’
7परंतु जर याहवेहने तिला आज्ञा दिली आहे, तर ती स्वस्थ कशी बसेल, त्यांनीच तिला आदेश दिला आहे ना अष्कलोन व समुद्राकाठी राहणार्‍यांवर हल्ला कर?”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.