Jeremiah reassuring a weary Baruch beside rolled blank scrolls as storm clouds pass over Jerusalem

यिर्मयाह 45

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
यिर्मयाहचे शब्द नोंदवताना बारूख वाहून नेत असलेल्या दुःख व थकव्याबद्दल शोक करतो. देव त्याला आठवण करून देतो की संपूर्ण भूमी उलथापालथीला सामोरे जात आहे, त्याला स्वतःसाठी महानता न शोधण्याची सांगतो, आणि तो जिथेही जाईल तिथे त्याचा जीव जपला जाईल असे वचन देतो.
बारूखनम्रताथकवाजतन
1यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम राजा, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितलेली याहवेहची सर्व वचने लिहून घेण्याचे काम नेरीयाहचा पुत्र बारूखाने संपविल्यानंतर, यिर्मयाहने हा संदेश त्याला दिला:
2“हे नेरीयाहचा पुत्र बारूखा, याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला असे सांगत आहेत:
3तू म्हणालास, ‘मला धिक्कार असो! माझ्या क्लेशात याहवेहने दुःखाची भर घातली आहे; मी उसासे टाकून थकून गेलो आहे आणि मला काही विश्रांती मिळत नाही.’
4परंतु याहवेहने मला तुला हे सांगण्यास म्हटले, ‘याहवेह असे म्हणतात: जे मी बांधलेले आहे ते मी नष्ट करेन, संपूर्ण पृथ्वीवर मी जे पेरले, ते मीच उपटून टाकेन.
5मग तू स्वतःसाठी मोठमोठ्या गोष्टी मिळवू पाहतोस काय? तसे करू नकोस, कारण या सर्व लोकांवर मी महान विपत्ती आणणार असलो, तरी मात्र तू जिथे जाशील, तिथे मी तुझा जीव वाचवेन,’ असे याहवेह जाहीर करतात.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.