
होशेय 3
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
देव होशेयला मूर्तिपूजा असूनही इस्राएलसाठी दैवी प्रेम प्रतिबिंबित करत अविश्वासू स्त्रीला पुन्हा प्रेम करण्यास सांगतो. होशेय तिला चांदी व सातूसाठी खंडणी देतो आणि विश्वासूपणाचा कालावधी आवश्यक करतो, इस्राएलच्या वंचिततेची व देव व दावीदिक राज्याकडे अखेरच्या परतीची अपेक्षा करत.
खंडणीस्थिर प्रेमविश्वासूपणापरतणे
1मग याहवेह मला म्हणाले, “जा आणि आपल्या पत्नीस आपली प्रीती पुनः प्रकट कर, जरी तिला दुसरा कोणता पुरुष प्रीती करतो आणि ती एक व्यभिचारिणी आहे. जरी ते इतर दैवतांकडे वळले असून पवित्र मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी याहवेह इस्राएली लोकांवर प्रीती करतात.”
2तेव्हा मी तिच्या सुटकेसाठी चांदीची पंधरा शेकेल व एक होमेर व एक लेथेक जव देऊन तिला विकत घेतले.
3मग मी तिला म्हणालो, “तुला अनेक दिवस माझ्याबरोबर राहवयाचे आहे; जारकर्म करू नकोस अथवा इतर पुरुषांकडे जाऊ नकोस, आणि मीही तुझ्यासोबत तसाच वागेन.”
4कारण दीर्घकाळापर्यंत इस्राएली लोक राजा अथवा राजपुत्र, यज्ञ अथवा पवित्र दगड, एफोद अथवा कुलदैवतांशिवाय राहतील.
5त्यानंतर इस्राएली लोक परत येतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराला आणि त्यांचा राजा दावीदाचा शोध घेतील. अखेरच्या काळात याहवेहकडे ते थरथर कापत आणि त्यांच्या आशीर्वादासाठी येतील.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.