The bronze altar and linen courtyard with Israelites preparing pure olive oil for the lamp

निर्गम 27

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
निर्गम 27 कंसाच्या वेदीसाठी आणि तिच्या साधनांसाठी सूचना देते, नंतर तागाच्या पडद्यांसह, खांबांसह आणि तळखड्यांसह निवासमंडपाचे अंगण परिभाषित करते. अध्याय कर्त्यासमोर दिवा सतत सांभाळता यावा म्हणून शुद्ध ऑलिव्ह तेलाची आवश्यकता सांगून संपतो.
कंसाची वेदीअंगणऑलिव्ह तेलसतत प्रकाश
1“बाभळीच्या लाकडाची वेदी तयार करावी, ती तीन हात उंच, पाच हात लांब व पाच हात रुंद असून ती चौकोनी असावी.
2तिच्या चार कोपर्‍यांना प्रत्येकी एक शिंग बनवावे, शिंगे व वेदी अखंड असावी. वेदीला कास्याचे आवरण द्यावे.
3वेदीवरील सर्व पात्रे, म्हणजेच राख उचलून नेण्याची भांडे, फावडे, शिंपडण्याचे भांडे, मांसाचे काटे आणि अग्निपात्रे कास्याचे असावीत.
4तिच्यासाठी कास्याची जाळी तयार करावी आणि जाळीच्या चारही बाजूला कास्याच्या चार कड्या तयार कराव्या.
5वेदीच्या काठाखाली ती अशाप्रकारे ठेवावी की ती वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत यावी.
6वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे तयार करून त्यांना कास्याचे आवरण द्यावे.
7दांडे कड्यात असे घालावेत की, वेदी वाहून नेताना ते तिच्या दोन बाजूंनी असतील.
8फळ्या लावून वेदी आतून पोकळ बनवावी. ती तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणेच बनवावी.”
9“निवासमंडपासाठी अंगण बनवावे. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात लांब असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे असावेत,
10आणि वीस खांब व वीस कास्याच्या बैठका बनवाव्या, खांबावर चांदीच्या कड्या व पट्ट्या असाव्या.
11उत्तरेकडील बाजू सुद्धा शंभर हात लांब असून तिलाही पडदे आणि वीस खांब व कास्याच्या वीस बैठका बनवाव्या, खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या असाव्या.
12“अंगणाच्या पश्चिमेकडील बाजू पन्नास हात रुंदीची असावी व त्यासाठी पडदे, व दहा खांब व दहा बैठका असाव्या.
13सूर्योदयाकडील पूर्वेकडील अंगण सुद्धा पन्नास हात रुंद असावे.
14प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात लांबीचा पडदा आणि तीन खांब व तीन बैठका असाव्या.
15आणि दुसर्‍या बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे, तीन खांब व तीन बैठका असाव्या.
16“अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी, निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व रेशमी तागाचा, वीस हात लांबीचा पडदा असावा; त्यावर भरतकाम केलेले असावे; त्यात चार खांब व चार बैठका असाव्या.
17अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व खांबांना चांदीच्या पट्ट्या, कड्या व कास्याच्या बैठकी असाव्या.
18अंगणाची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पाच हात उंचीचे पडदे आणि कास्याच्या बैठकी असाव्या.
19निवासमंडपातील सेवेसाठी लागणारी सर्व पात्रे व उपकरणे, त्यांच्या मेखा व अंगणाच्या सर्व मेखा कास्याच्या असाव्यात.”
20“इस्राएली लोकांना आज्ञा दे की दिवे अखंड पेटत राहावे म्हणून त्यांनी कुटून काढलेले जैतुनाचे शुद्ध तेल तुझ्याकडे आणावे.
21सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात त्याच्याबाहेर, अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी याहवेहसमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिवे पेटत ठेवावे. इस्राएलात हा विधी पिढ्यान् पिढ्या असावा.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.