Mordecai listening to families and elders at the palace gate above a flourishing landscape

एस्तेर 10

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
पुस्तक राजाच्या सत्तेची आणि मर्दखयच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर वाढीची नोंद करत संपते. मर्दखय यहुद्यांमध्ये आदरणीय आहे कारण तो आपल्या लोकांचे कल्याण शोधतो आणि पुढील पिढ्यांशी शांतीने बोलतो.
मर्दखयनेतृत्वलोकसेवाकल्याणशांती
1अहश्वेरोश राजाने आपल्या संपूर्ण साम्राज्याच्या मुख्य भूमीवर व समुद्रकिनाऱ्यावरील बेटांवर कर लावला.
2मर्दखय यहूदीस उच्चपद प्रदान केले, मर्दखयाची थोरवी, त्याची महान कृत्ये आणि त्याचप्रमाणे त्याला राजाकडून प्राप्त झालेले सन्मान यांची साद्यंत हकिकत मेदिया व पर्शियाच्या राजाच्या इतिहासग्रंथात लिहिलेली नाही काय?
3खुद्द अहश्वेरोश राजाच्या खालोखाल मर्दखयचे पद होते. अर्थात्, तो यहूदी लोकांमध्ये अतिशय थोर होता आणि त्याचे सर्व देशबांधव त्याचा फार आदर करीत, कारण तो आपल्या लोकांचे कल्याण व्हावे म्हणून खूप झटत असे व त्यांच्या हितासाठी रदबदली करीत असे.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.