Two traveling messengers with sealed scroll cases receiving a warm welcome from a first-century house church

कलस्सैकरांस 4

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
पौल सततच्या, कृतज्ञ प्रार्थनेची आणि बाहेरच्यांप्रती शहाण्या, कृपाळू आचरणाची विनंती करतो. तो तुखिकस व अनेसिमसची शिफारस करतो, सहकाऱ्यांच्या व्यापक जाळ्यात आणि शेजारील मंडळ्यांना अभिवादन पाठवतो, पत्रांबद्दल सूचना देतो, आणि कैदेतून संपतो.
सतत प्रार्थनाकृपाळू भाषणतुखिकस व अनेसिमससहकारी
1धन्यांनो, तुम्ही तुमच्या दासांना जे उचित व योग्य ते द्या; कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्हालासुद्धा स्वर्गात स्वामी आहे.
2जागृत राहून आणि उपकारस्तुतीसह प्रार्थनेत तत्पर राहा.
3ख्रिस्ताच्या रहस्याची घोषणा आम्हाला करता यावी याकरिता परमेश्वराने आमच्या संदेशासाठी दार उघडावे म्हणूनही प्रार्थना करा. त्याचकरिता मी या बंधनात आहे.
4ती जशी स्पष्टपणे सांगितली पाहिजे, तशी मला सांगता यावी, म्हणून प्रार्थना करा.
5बाहेरील लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; आणि प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या.
6तुमचे संभाषण सर्वदा कृपेने भरलेले, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला कळेल.
7तुखिक माझे सर्व वर्तमान तुम्हाला सांगेल. तो माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी आहे.
8मी त्याला याच हेतूने पाठवित आहे की त्याद्वारे तुम्हाला आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुमच्या हृदयास प्रोत्साहित करावे.
9विश्वासू व अतिप्रिय बंधू अनेसिम, तुम्हामधील एक, यालाही मी तुम्हाकडे पाठवित आहे. तो व तुखिक तुम्हाला येथील सर्व अद्यावत बातम्या देतील.
10माझ्याबरोबर येथे बंदिवान असलेला अरिस्तार्ख, तसेच बर्णबाचा नातेवाईक मार्कही तुम्हाला आपली शुभेच्छा पाठवितात. मी पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे मार्क कधी तुमच्याकडे आला, तर त्याचे मनापासून स्वागत करा.
11येशू म्हटलेला यूस्त देखील आपली शुभेच्छा पाठवित आहे. परमेश्वराच्या राज्यासाठी हेच तेवढे यहूदी येथे माझे सहकारी आहेत आणि ते माझ्या सांत्वनाचे कारण झाले आहेत.
12जो तुमच्यातील एक आणि ख्रिस्त येशूंचा दास, एपफ्रास, तुम्हाला शुभेच्छा पाठवितो. तो तुमच्यासाठी नेहमी झटून प्रार्थना करून परमेश्वराजवळ मागतो, की परमेश्वराच्या इच्छेमध्ये तुम्ही परिपक्व व पूर्ण खात्री झालेले असे स्थिर उभे राहावे.
13मी साक्ष देतो की, त्याने तुमच्यासाठी आणि लावदिकीया व हिरापोलिस येथील लोकांसाठी फार श्रम केले आहेत.
14प्रिय वैद्य लूक आणि देमास आपली शुभेच्छा पाठवित आहेत.
15लावदिकीया येथील विश्वासणार्‍या बंधुजनांस, नुंफा व तिच्या घरात जमणार्‍या मंडळीला माझ्या शुभेच्छा सांगा.
16तुमच्यासाठी हे पत्र वाचून झाल्यानंतर ते लावदिकीया मंडळीकडेसुद्धा वाचण्यास देणे आणि त्याबदल्यात लावदिकीयाकडून आलेले पत्र वाचावे.
17अर्खिप्पाला सांगा, “प्रभूमध्ये तुला जी सेवा दिलेली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष देणे.”
18मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी या शुभेच्छा लिहित आहे. माझ्या बंधनाची आठवण ठेवा. परमेश्वराची कृपा तुम्हाबरोबर असो.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.