
आमोस 3
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
इस्राएलची अद्वितीय सुटका व कराराचे नाते विशिष्ट जबाबदारी आणतात. जोडलेल्या प्रश्नांद्वारे, आमोस आग्रह धरतो की आपत्ती व भविष्यसूचक इशाऱ्याला कारणे आहेत: परमेश्वर बोलतो तेव्हा संदेष्ट्याने प्रतिसाद द्यावा लागतो. शोमरोनची अव्यवस्था तिच्या वेद्या व विलासी घरे पडण्याआधी पाहण्यासाठी परदेशी साक्षीदार बोलावले जातात.
कराराची जबाबदारीभविष्यसूचक इशाराशोमरोनन्याय
1इस्राएलच्या लोकांनो, हे वचन ऐका, जे याहवेह तुमच्याविरुद्ध बोलले आहेत—त्या संपूर्ण घराण्याविरुद्ध आहे ज्यांना मी इजिप्तमधून बाहेर आणले आहे:
2“पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील लोकांमधून मी फक्त तुझीच निवड केली आहे; म्हणून तुझ्या सर्व पापांबद्दल मी तुला शिक्षा करेन.”
3दोन व्यक्ती एकमताचे झाल्यावाचून ते सोबत चालू शकतील काय?
4शिकार नसली तर सिंह गर्जना करेन काय? काही धरल्याशिवाय तो त्याच्या गुहेत गुरगुरणार काय?
5अमिष नसताना पक्षी भूमीवरील सापळ्यात अडकतो काय? जर सापळ्यात काही अडकले नसेल तर ते भूमीवरून उडेल काय?
6नगरात जेव्हा रणशिंगाचा आवाज येतो, तेव्हा लोक घाबरत नाही काय? शहरात विपत्ती आली तर, ती याहवेहने घडवून आणली नाही काय?
7सार्वभौम याहवेह आपल्या सेवक संदेष्ट्यांना त्याच्या योजना प्रकट केल्याशिवाय निश्चितच काहीही करणार नाही.
8सिंहाने गर्जना केली आहे— कोण भिणार नाही? सार्वभौम याहवेहने बोलले आहेत; तर मग संदेश दिल्यावाचून कोणी राहील काय?
9अश्दोदच्या गडांना आणि इजिप्तच्या गडांना ही घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतावर एकत्र व्हा; तिच्यामधील गोंधळ आणि तिच्या लोकांवरील अत्याचाराकडे पाहा.”
10“जे योग्य ते कसे करावे हे त्यांना माहीत नाही,” याहवेह जाहीर करतात, “त्यांनी लुटलेला व चोरी केलेला माल त्यांच्या महालात कोणी साठवून ठेवला आहे.”
11यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात, “एक शत्रू जो तुमचा देश व्यापून टाकेल, तो तुमचे किल्ले कोसळून टाकेल आणि तुमचे गड लुटेल.”
12याहवेह असे म्हणतात: “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून केवळ दोन तंगड्या आणि कानाचा एक तुकडा सोडवितो, तसे शोमरोनातील इस्राएल लोक जे पलंगाच्या शीरपट्टीने आणि बिछान्यावरील रेशमी कापडाच्या तुकड्याने सोडविले जातील.”
13“हे ऐका आणि याकोबाच्या घराण्याविरुद्ध साक्ष द्या,” असे याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतात:
14“ज्या दिवशी मी इस्राएलला तिच्या पातकाबद्दल शिक्षा करेन, त्याच दिवशी मी बेथेलमधल्या वेद्यांचा नाश करेन; वेद्यांची शिंगे कापून टाकण्यात येतील आणि ती जमिनीवर पडतील.
15मी ग्रीष्मकालीनघर आणि उष्मकालीनघर पाडून टाकेन; हस्तिदंताने सजविलेल्या घरांचा विध्वंस होईल भवने जमीनदोस्त होतील,” असे याहवेह जाहीर करतात.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.